• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुंबई -पुणे महामार्गावर भीषण अपघात : खाजगी बस दरीत कोसळली ; १३ जणांचा मृत्यू !

मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली १५ लाखांची मदत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2023
in क्राईम, राज्य
0
मुंबई -पुणे महामार्गावर भीषण अपघात : खाजगी बस दरीत कोसळली ; १३ जणांचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १५ एप्रिल २०२३ ।

राज्यात आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस दरीत कोसळली असून यात १३ जणांचा मृत्यू झाले असून २० ते २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची तात्काळ दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील, असेही सांगितले.

बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या खासगी बसमध्ये 42 प्रवासी होते. 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जणाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. तर, या दुर्घटनेत 29 प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमी प्रवाशांना दरीतील बसमधून बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरित प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. पहाटे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीच पुण्याहून ही बस मुंबईला निघाली होती.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले आहे. आतापर्यंत 29 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. या जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आणखी प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहेत. बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी माध्यमांना सांगितले की, खाजगी बसमध्ये मुंबईतील गोरेगावमधील बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) होते. ते सर्वजण पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली. बसमध्ये आणखी काही प्रवासी अडकल्याची भीती आहे. दरीत कोसळलेल्या बसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीला स्थानिक हायकर्स ग्रुप आणि आयआरबी टीम दाखल झाली आहे.
1) आशिष विजय गुरव, (वय 19), दहिसर मुंबई. 2) यश अनंत सकपाळ, (वय 17) गोरेगाव, मुंबई, 3) जयेश तुकाराम नरळकर (वय 24) कांदिवली, मुंबई, 4) वृषभ रवींद्र कोरमे, (वय 14) गोरेगाव, मुंबई, 5) रुचिका सुनील डुमणे (वय 17), गोरेगाव, मुंबई, 6) आशिष विजय गुरव, (वय १९) दहिसर, मुंबई 7) ओंकार जितेंद्र पवार (वय 25) खोपोली, रायगड 8) संकेत चौधरी (वय 40) गोरेगाव, मुंबई 9) रोशन शेलार (वय 35) मुंबई 10) विशाल अशोक विश्वकर्मा (वय 23) गोरेगाव, मुंबई 11) निखिल संजय पारकर (वय 18) मुंबई 12) युसुफ मुनीर खान (वय 13) मुंबई 13) कोमल बाळकृष्ण चिले (वय 15) सांताक्रुज, मुंबई 14) अभिजीत दत्तात्रेय जोशी (वय 20) गोरेगाव, मुंबई 15) मोहक दिलीप सालप (वय 18) मुंबई 16) दिपक विश्वकर्मा, (वय २०) गोरेगाव 17) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम (वय १८) गोरेगाव

खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे
१) नम्रत रघुनाथ गावनुक, (वय १८) गोरेगाव, २) चंद्रकांत महादेव गुडेकर, (वय 29) गोरेगाव, मुंबई ३) तुषार चंद्रकांत गावडे, (वय 22) ४) हर्ष अर्जुन फाळके, (वय 19) विरार ५) महेश हिरामण म्हात्रे, (वय २०) गोरेगाव, मुंबई ६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, (वय 16) गोरेगाव, मुंबई ७) शुभम सुभाष गुडेकर, (वय 22) गोरेगाव 8) ओम मनीष कदम, (वय १८) गोरेगाव, मुंबई. 9) मुसेफ मोईन खान, (वय २१) गोरेगाव, मुंबई

Tags: #accident

Related Posts

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group