जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।
जळगाव शहरासह परिसरात सोसाट्याचा वारा आणि वादळी वाऱ्यानंतर रात्री ८ वाजेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील अर्ध्या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन या बदलांमध्ये चढ-उतार सुरू आहे.मात्र, या आठवड्यात सकाळी दहावाजेपासून उन्हाचे चटके बसत आहेत. सायंकाळ पाच वाजेपर्यंत उकाड्याने नागरिक हैराण होत आहे. शनिवारी देखील सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असताना सायंकाळी चार वाजेनंतर वातावरणात बदल होऊन रात्री दहा वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या बेमोसमी पावसामुळे रात्री नागरिकांची एकच धावपळ उडाली. तसेच रात्रीच्या सुमारास वादळ वाऱ्यामुळे शहरातील गोलाणी मार्केट, नवीपेठ, शिवाजी नगर यासह काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर काही भागात विजेची ये-जा सुरू होती




















