
जळगाव मिरर / १६ एप्रिल २०२३ ।
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या दर्जी फाऊंडेशनच्या शुभम सतिष जोशी या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदी यशस्वी निवड झाली. आय.बी.पी.एस.तर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शुभम जोशीने यशस्वी बाजी मारली. भारतातील विविध बँकांमध्ये परिविक्षाधीन अधिकारी पदासाठी निवड चाचणी घेण्यात आलेली होती. पुर्व परीक्षेसह मुख्य परीक्षा आणि मुलाखत चाचणी शुभम जोशीने चांगले गुण मिळवून आपली निवड सार्थ ठरविली आहे. दर्जी फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या अभ्यासातल्या अनेक शंकांचे निरसन झाले. प्रा.गोपाल दर्जी यांनी व्यक्तिशः मार्गदर्शन केल्याने आत्मविश्वास अजून दृढ झाला. म्हणूनच माझ्या यशस्वी निकालात भर पडली. असे उद्गार शुभम जोशीने व्यक्त केले.
बँकींग परीक्षेमध्ये दर्जी फाऊंडेशनच्या शुभम जोशीची निवड इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे या परीक्षांमध्ये खान्देशातील विद्यार्थ्यांची गोडी वाढेल आणि अजून इतरही विद्यार्थी यशस्वी होतील शुभम जोशीमुळे दर्जी फाऊंडेशनच्या निकालात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शुभम सारखे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या निवडलेल्या क्षेत्रात सातत्य पुर्ण प्रामाणिक व योग्य मार्गदर्शनासह प्रवास केल्यास त्याला आपले यश निश्चित मिळेल. असे मत प्रा.गोपाल दर्जी यांनी व्यक्त केले. प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड झालेल्या शुभम जोशीचे प्रा.गोपाल दर्जी यांच्यासह, श्रीराम पाटील, सौ.ज्योती दर्जी यांनीअभिनंदन केले.





















