
जळगाव मिरर / २४ एप्रिल २०२३ ।
राज्याचे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी जळगाव शहरात येत कुठल्याही प्रकारचे भाषण न केल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी जळगावात आले शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रभागात शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करीत पाचोऱ्याच्या दिशेने रवाना झाले.
गेल्या आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघरमध्ये एका पुरस्कार सोहळा भर दुपारी ठेवला होता. त्यामध्ये १३ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. सध्या उन्हाचा तडाखा जास्त आहे. जळगावात देखील ऊन जास्त आहे. त्यामुळे आपण भाषण करणार नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितले.
जळगावातील पिंप्राळा उपनगरात शिवस्मारकाचे भुमीपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम दुस-या दिवशी संध्याकाळी घ्यावा, अशी सूचना आपण आयोजकांना दिली होती. मात्र ऐकेल तो शिवसैनिक कसा असे सांगत उपस्थित सर्व शिवसैनिकांचे आभार मानत भाषण करण्यास त्यांनी नकार दिला. शिवस्मारकाचे काम तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाचे चांगले नियोजन करून मी अवश्य उपस्थित राहिल असा शब्द यावेळी त्यांनी दिला.






















