जळगाव मिरर / २५ एप्रिल २०२३ ।
दर्जी फाउंडेशनतर्फे नुकताच पुस्तक दिन साजरा करण्यात आला. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी दर्जी फाउंडेशनचे साने गुरुजी वाचनालय सर्वांसाठी खुले करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रा. गोपाल दर्जी यांनी पुस्तक दिनाची माहिती सांगितली. प्रेरणादायी पुस्तके, वृत्तपत्रे वाचून आपण आपले विचार बदलविणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. दर्जी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी दररोज दोन तास नियमित वाचन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्जी फाउंडेशनच्या संचालिका ज्योती दर्जी, शिक्षक आदींनी सहकार्य केले..





















