जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२६
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची पोलीस मुख्यातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवार दि. २२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास काढले. अचानक झालेल्या या बदलीमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

जिल्ह्यात शनिपेठ पोलीस ठाणे हे अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. वर्षभरापुर्वी रावेर येथून बदली होवून आलेले डॉ. विशाल जयस्वाल यांची शनिपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची पुढील आदेश होईपर्यंत पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे कारण अस्पष्ट असून याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढले. अचानक झालेल्या बदलीमुळे पोलीस दलात खळबळ माजून गेली आहे. दरम्यान त्यांचा पदभार शहर पोलीस ठाण्याचे पीआय सागर शिंपी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला.



















