जळगाव मिरर / २६ एप्रिल २०२३
पुणे येथील सुप्रसिद्ध एम.आय.टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे रविवार दि. 23 एप्रिल 2023 रोजी जळगाव शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान मेगा करिअर गाईडन्स सेमिनारचे आयोजन 12 वी विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य करण्यात आले होते. यामध्ये इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, बिझनेस ॲण्ड लिडरशिप, सायन्स ॲण्ड हेल्थ सायन्स तसेच आर्ट डिझईन ॲण्ड ह्युमॅनिटीजशी निगडीत विविध अभ्यासक्रमांची माहिती उपस्थिती विद्यार्थ्यांना व पालकांना देण्यात आली. एम.आय.टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे तर्फे डॉ. दिनेश भुतडा, प्रा. सचिन कुळकर्णी, प्रा. अभिजीत चोरे, डॉ. जयदिप जाधव, विरेंद्र गुप्ता, नीतू उपाध्याय यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून प्रोफेशनल टिचर असोसिएशन चे जळगाव जिल्हाध्यक्ष वेंकटेश अयंगार, सचिव विश्वेश खंडेलवाल, प्रा. नंदलाल गादीया, दिनेश लोढा, सचिन पटेल, एम.बी.झंवर, केदार पांडे, युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया, कार्याध्यक्ष प्रितम शिंदे, सचिव अमित जगताप उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. १२ वी चे ८९० तर ११ वीच्या २११ एकूण ११०१ विद्यार्थी व पालकांनी सहभाग नोंदविला. उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका सुद्धा देण्यात आल्या. प्राध्यापकांनी पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे विविध अभ्यासक्रमांची व तद्नंतरच्या त्या क्षेत्रातील भविष्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, सयाजी जाधव, संस्कृती नेवे, मेघना भोळे, प्रशांत वाणी, हर्षल मुंडे, वैभव कुशारे, राहुल चव्हाण, मयूर अलकारी, श्रव्य श्रावगे, मयांक पाटील, अजय खैरनार, संदीप सूर्यवंशी, पियुष हसवाल, उमाकांत जाधव आदिंनी परिश्रम घेतले.




















