
जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३ ।

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. घरात तरुणाने सुसाईटनोट लिहून ठेवली होती. मयत तरुणाचे नाव उमेश एकनाथ ठाकूर (३७) असून सुसाईट नोटमध्ये लिहले आहे कि, माझ्या आत्महत्येला चार लोक सर्वस्वी जबाबदार आहेत. मला वारंवार मानसिक त्रास देऊन मला जिवे मारण्याची धमकी देत असतात. त्यांच्यापासून माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. यात माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नसून मला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये बुधवारी दुपारी १ वाजता उघडकीला आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची उमेश ठाकूर यांनी गळफास घेतल्याचा प्रकार त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मन हेलवणारा आक्रोश केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि उमेशला तत्काळ जिल्हा रुग्णालयात वाहनातून हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी तपासणीअंती उमेश यांना मृत घोषित केले. या वेळी नातेवाईकांसह मित्रमंडळींची रुग्णालयात एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी देखील रुग्णालयात येऊन पंचनामा केल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उमेशच्या पँटच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट मिळून आली आहे. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मयताच्या पश्चात आई-वडील, भाऊ, विवाहित बहीण, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. प्राथमिक तपास अल्ताफ पठाण करीत आहेत.




















