जळगाव मिरर / २७ एप्रिल २०२३
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड जळगाव शहर यशवंत नगर येथे शाखा स्थापन करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना,शिवमती कांचन पाटील, शिवमती जयश्री पाटील यांनी केली.

यशवंत नगर विभाग जिजाऊ ब्रिगेड शाखा प्रमुख म्हणून शिवमती मीनाताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. शिवमती वर्षाताई पाटील यांच्या हस्ते शिवमती प्रियंका देसले व शिवमती जयश्री भोसले यांची शहर संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मार्गदर्शक शिवमती ज्योती ताई पाटील यांनी महिलांना श्रद्धा व अंधश्रद्धा यातील अंतर अनिष्ट रूढी व परंपरा विधवा प्रथा बंदी साठी आव्हन केले. जिल्हाध्यक्ष शिवमती लीना ताई पवार यांनी मराठा सेवा संघाची उत्पत्ती व जिजाऊ ब्रिगेडचे कार्य याबद्दल महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना शहर प्रमुख शिवमती मनीषा पाटील यांनी मांडली.सूत्रसंचालन जयश्री भोसले यांनी केले . शिवमती करुणा गरुड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या उत्कृष्टेसाठी शिवमती गीतांजली देसले, शिवमती शकुंतला चव्हाण शिवमती रोहिणी सोनवणे शिवमती चारुशीला पाटील यांचे सहकार्य झाले. समाजातील सर्व स्तरातील महिला कार्यक्रमास उपस्थित होते. विधवा प्रथा बंद साठी *महिलांना आव्हान केले. तसेच उपस्थित महिलांकडून जिजाऊ ब्रिगेडचे सदस्य फॉर्म भरून घेण्यात आले.




















