अमळनेर | विक्की उत्तम जाधव
येथील प्रताप महाविद्यालयात १ मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने खान्देश शिक्षण मंडळाचे चिटणीस तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. जयेश गुजराथी, डॉ. जयंत पटवर्धन, डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. पराग पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. विजय मांटे (सर्व उपप्राचार्य) प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास मोरे, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अमृत अग्रवाल, प्रा. सचिन पाटील, डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले.




















