
जळगाव मिरर | ६ मे २०२३

शहरातील एका परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी इसमाने फूस लावत पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात एका परिसरात आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असलेल्या १७ वर्षीय मुलीला ४ मे रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजे दरम्यान अनोळखी इसमाने आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.




















