जळगाव मिरर | ७ मे २०२३
तस्सं तर आयुष्यच कुजत होतं तिचं झाडं-झुडपात. झुडपातल्या बोचणाऱ्या काट्यांच्या वेदना जणू पाचवीला पुजलेली, अशीच दयनीय अवस्था तिची. ती नजरेस पडली तरी नाकावर हात ठेवणाऱ्यांच्या द्वेषभावनाही तेवढ्याच बोचणाऱ्या होत्या. तशातच बेवारस अवस्थेत पडलेल्या ‘कल्पना’ला हात मिळाला माणुसकीचा. मग सुरू झाला परप्रांतीय बेवारस कल्पनाच्या आयुष्याचा प्रवास… हक्काच्या घरात
एमआयडीसीतल्या एका कोनाकोपऱ्यात झाडाझुडपांमध्ये निवारा करणारी कल्पना तिला नेमकं दुःखही सांगता येत नाही.

नारी शक्ती ग्रुपच्या मनीषा पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या वंदना मंडावरे यांच्या नजरेस ‘कल्पना’ पडली. आमदार सुरेश भोळे आणि महापौर जयश्री महाजन यांच्या स्वीय सहायक ललित धांडे यांना दोघींनी फोन केला. तेव्हा रुग्णवाहिका दाखल झाली. जानकी परदेशी, सकू राठोड, संजय परदेशी, करुणा मराठे, सुभाष राठोड, गौतम सपकाळ, पप्पू जगताप, रुग्णवाहिका चालक अशोक सपकाळे यांनी तिला जिल्हा रुग्णालयात आणले. आठ दिवस उपचार झाले त्यानंतर तिला संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रात दाखल करण्यात आले




















