जळगाव मिरर | ७ मे २०२३
येथील पद्मालय विश्रामगृह येथे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या नियोजनाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शाम जयवंतराव पाटील होते.

बैठकीच्या सुरवातीला सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. तद्नंतर जिल्हाध्यक्ष तुषार सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या विविध येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तद्नंतर विविध पदाधिकाऱ्यांनी देखील आपापल्या सूचना व्यक्त करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात मदत केली. बैठकीचे अध्यक्ष शाम पाटील यांनी आपल्या संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली. मराठी तरुणांनी उद्योगांकडे वळलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत सामाजिक कार्य यशस्वीपणे करू शकत नाही असे मत शाम पाटील यांनी मांडले. विभागीय अध्यक्षांच्या हस्ते गणेश भागवत पाटील यांची जिल्हा संघटक पदी तर शंतनू जितेंद्र जगताप यांची महानगर सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.
बैठकीला जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, महानगर अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मयूर चौधरी यांच्यासह संदीप मांडोळे, सतिष लाठी, राजेश पाटील, तेजस पवार, भरत पाटील, विठ्ठल पाटील, राहुल जाधव, राहुल पाटील, आकाश धनुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




















