
जळगाव मिरर | ९ मे २०२३

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अल्पवयीन मुलीना पळविण्याच्या घटना मोठ्या संख्येने घडत आहे. त्यात पुन्हा आज देखील भर पडली असुन जळगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातून एक १७ वर्षीय तर एक १६ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलीना अनोळखी इसमाने पळवून नेल्याप्रकरणी एमआयडीसी तर जळगाव तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या धानवड परिसरातील एका १७ वर्षीय मुलीला दि ८ मे २०२३ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास मुलगी परिवारासोबत गच्चीवर झोपलेली असतांना अनोळखी इसमाने तिला काही तरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास पोउनी.अनिस शेख हे करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील नांद्र गावातील परिसरातून एका १६ वर्षीय मुलीस दि ८ मे २०२३ सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास मुलीच्या राहत्या घरातून अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तक्रार तालुका पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोउनी.नयन पाटील हे करीत आहेत.




















