जळगाव मिरर | १४ मे २०२३
दि.१५ मे रोजी उद्या जळगाव शहरात बेरोजगार मोर्चातर्फे बेरोजगार जोड़ो यात्रेचे आयोजन केलेले आहे. सदर यात्रा ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जळगांव जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी सकाळी १० वाजता निघणार आहे. या यात्रेचे नेतृत्व मा.डॉ. विलास खरात (राष्ट्रीय प्रचारक भा.बे. मो. नवी दिल्ली), मा. सिध्दांत मौर्य, (राष्ट्रीय प्रचारक, भा.वे. मो. नवी दिल्ली) व मा. विक्की बेलखोडे (राष्ट्रीय संयोजक, भा.बे. मो. नवी दिल्ली) यांच्या नेतृत्वात निघणार आहे.

बेरोजगार जोडो यात्रा का निघत आहे ? तर स्वतंत्र भारतात बेरोजगारी खुप जोरात वाढत आहे, सहकारी क्षेत्रात लोकसंख्येनुसार रोजगार उपलब्ध होत नाही, भारतात कमीत कमी 40 कोटी युवा बेरोगारांच्या हाताला काम नाही आहे. प्रति दिवस बेरोजगाराच्या कारणास्तव देशात दिवसाला 38 सुशिक्षीत बेरोजगारांना आत्महत्येचा मार्ग अवलंबिला जात आहे. तसेच भारतातील सहकारी संस्था याचे प्रायव्हेटीकरणामुळे सुध्दा बेरोजगारी वाढत आहे. वाढते बेरोजगारी मुळे युवकांमध्ये हिंदू मुस्लीम, धार्मिक हिंसा, अपराध, हत्या लुट, मॉबलिचींग इ. मध्ये ह्या युवकांना अडकविले जात आहे अशा असंख्य समस्यांमुळे भारतातील युवा बेरोजगार हताश आहेत.
तरी या अशा असंख्य समस्येमुळे भारतातील सर्व युवा बेरोजगारांना एकत्र करून बेरोजगार जोडो यात्रा समस्त भारतात निघत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगांव जिल्ह्यात ही यात्रा आयोजीत करण्यात आली आहे. तरी या यात्रेत हजारोच्या संख्येने युवा बेरोजगार सामील व्हावे असे आवाहन विजय सुरवाडे यांनी केले आहे.




















