• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबीची मोठी कारवाई : तब्बल ३१ घरफोड्या करणाऱ्या आरोपीना घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एलसीबीची मोठी कारवाई : तब्बल  ३१ घरफोड्या करणाऱ्या आरोपीना घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २३ मे २०२३

जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यातील विविध अपार्टमेंटमध्ये घुसून भरदिवसा चो-या घरफोड्या तब्बल ३१ गुन्हे करणा-या गुन्हेगारांच्या अट्टल टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, सागर लक्ष्मण देवरे तर पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील आकाश सुभाष निकम, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे सामनेर येथील अमोल सुरेश चव्हाण अशी घरफोड्या करणा-या टोळीच्या सदस्यांची नावे उघडकीस आली आहेत. यापैकी जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील आणि पवन उर्फ पप्पु सुभाष पाटील हे फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिस पथक तिघा फरार गुन्हेगारांच्या मागावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील घरफोडीचे तब्बल ३१ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सर्व प्रथम सागर लक्ष्मण देवरे, आकाश सुभाष निकम, अमोल सुरेश चव्हाण, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. अधिक चौकशीअंती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील, सागर लक्ष्मण देवरे, आकाश सुभाष निकम, महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे असे सर्वजण गेल्या दोन ते तिन वर्षापासून गटागटाने चो-य घरफोड्या करण्यासाठी स्विफ्ट डीझायर, क्रेटा तसेच आर्टीगा अशा चारचाकी वाहनांचा वापर करत होते. गुन्हा करतांना हे गुन्हेगार त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनांची वेगवेगळ्या पासिंगची नंबर प्लेट वेळोवेळी बदलत होते.

जळगाव जिल्ह्यातील चोरी, घरफोडीच्या उघडकीस आलेल्या गुन्ह्यात निष्पन्न झालेले सातही जण त्यांच्या कडे असलेल्या कारला वेगवेगळ्या नंबर प्लेट लावून फिरत असल्याचीमाहिती पोलिस प्रशासनाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्याअख्त्यारीत पथकांची निर्मीती करण्यात आली होती. जळगाव जिल्हात विशेषत: जळगाव शहर, भुसावळ व चाळीसगाव येथे तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे जिल्ह्यांमध्ये भरदिवसा विशेषत अपार्टमेंटमध्ये घरफोडी केली जात होती. बंद असलेल्या घरांचे कुलूप त्यांच्या कडील हत्याराने तोडून या टोळीने अनेक घरफोड्या केल्या असल्याची कबुली ताब्यातील अट्टल गुन्हेगारांनी दिली आहे. त्यांच्या ताब्यातुन तिन लाख रुपयांची रोख रक्कम, चांदीचे दागिने, तसेच घरफोडी करण्यासाठी लागणारे विविध हत्यारे, एक गावठी कट्टा व चारचाकी वाहनांच्या वेगवेगळ्या पासिंगच्या चोवीस नंबरप्लेट असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

घरफोडीत मिळालेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी त्यांना अमोल सुरेश चव्हाण (रा. सामनेर ता. पाचोरा) याने मदत केली आहे. या दागिन्यांपैकी काही दागिने अमोल चव्हाण याने वेळोवेळी त्याच्या ओळखीचे योगेश हनुमंत मोरे (लक्ष्मी ज्वेलर्स) जोशीपेठ, जळगाव तसेच संकेत शशिकांत देशमुख (स्वस्तीक ज्वेलर्स) जोशीपेठ, जळगाव यांना विकले असल्याचे कबुल करण्यात आले आहे. दागिने चोरीचे असल्याचे माहिती असून देखील दुकानदारांनी ते विकत घेत होते अशी माहीती पुढे आली आहे. जितेंद्र गोकुळ पाटील, अमोल गोकुळ पाटील, पवन ऊर्फ पप्पु सुभाष पाटील (सर्व रा. मोहाडी ता. जामनेर) हे तिघे त्यांच्या ताब्यातील वाहनांसह फरार झाले आहेत. ते पकडले गेल्यास त्यांच्याकडून अजुन बरेच गुन्हे उघडकीस येणार असल्याचे या निमीत्ताने म्हटले जात आहे. तसेच चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या दुकानदारांची नावे समोर येवू शकतात असेही म्हटले जात आहे.

यांनी केली कारवाई !

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, अमोल देवढे, सहायक फौजदार युनुस शेख, रवी नरवाडे, अनिल जाधव, हे.कॉ. राजेश मेंढे, संजय हिवरकर, सुनिल दामोदरे, संदिप पाटील, अशरफ शेख, गोरख बागुल, कमलाकर बागुल, जयंत चौधरी, अनिल देशमुख, अक्रम शेख, संदिप सावळे, लक्ष्मण पाटील, दिपक पाटील, पोना संतोष मायकल, प्रितम पाटील, प्रविण मांडोळे, रणजीत जाधव, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, परेश महाजन, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, महेश पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी (सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) तसेच मुख्यालयातील कर्मचारी करुणा सागर, अशोक जाधव आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

Tags: #jalgaonpolice

Related Posts

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!
जळगाव ग्रामीण

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !
जळगाव

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026
भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !
क्राईम

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

August 15, 2026
रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला
जळगाव

रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला

August 15, 2026
मुक्ताईनगरात खळबळ : १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ : १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू !

August 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026
भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

August 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group