जळगाव मिरर | १५ जुलै २०२३
जळगाव शहरातील एका परिसरातील ३५ वर्षीय महिला मध्यरात्रीच्या सुमारास वारंवार फोन करुन देखील महिलेने फोन न उचलल्याने एक इसम थेट तिच्या घरात घुसून तिच्याशी अंगलट करणा-याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावर असलेल्या के.सी.पार्क परिसरात एक महिला आपल्या परिवारासह रहिवासास असून दि. १४ रोजी रात्री ११.५० वाजेपासून त्याच्या मोबाईलवरुन महिलेला फोन केले. पण तिने त्याचा कुठलाही फोनला उत्तर न दिल्याने त्याने थेट मध्यरात्री साडेबारा ते पाऊन वाजेच्या सुमारास महिलेचे घर गाठत. महिलेच्या घराच्या कंपाऊंड वॉलवरुन उडी मारुन तिचा लोटलेला दरवाजा उघडून तिची भेट घेतली. त्याने तिच्यासोबत अंगलट सुरु करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने पहाटेच्या सुमारास जळगाव शहर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रमेश शेंडे करत आहेत.