मुंबई : वृत्तसंस्था
संभाजी भिडे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्यानंतर कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी विधानसभेत केल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचे मेल आलेले आहे. त्या मागणीनंतर त्यांना अज्ञाताकडून धमकीचे मेल आले आहेत. धमकीनंतर आता त्यांच्या कराडमधील निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अज्ञाताकडून धमकीचा मेल आला आहे. संभाजी भिडे यांच्याबद्दल विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.