अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्ताने पालखी मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करण्यात. अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने राजवड येथे निसर्गरम्य वातावरणात फोटोग्राफी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सुशोभीत पालखी मिरवणूक काढून कॅमेराची मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. आणि ह्या वर्षभरात काही फोटोग्राफर त्याच्या परिवारात मयत झालेल्या व्यक्तींच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आदरांजली वाहण्यात आली. तर पुढे कार्यक्रमात ज्या फोटोग्राफर बंधूंचे आणि त्यांच्या पाल्याचे विविध क्षेत्रात यश संपादन केले अशा फोटोग्राफर आणि विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषीभूषण मा.आ.साहेबराव पाटील होते. माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी फोन करून फोटोग्राफर बांधवाना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी फोटोग्राफर बंधू साठी सहकुटुंब स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी अमळनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन चे सर्व पदाधिकारी फोटोग्राफर उपस्थित होते. सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले.