
जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२३ | राज्यातील अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुणालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा वेळेवर योग्य उपचार करण्यात आले नाही. असा आरोप करत डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुफान मारामारी झाली. यामुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथील एक रुग्ण गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्या रुग्णांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत कुठलाही उपचार केला नसून कोणतेही औषध डॉक्टरांनी दिले नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. याबाबत विचारणा करायला गेलेल्या रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात जोरदार राडा झाला असून या राड्याचे रूपांतर नंतर तुफान मारामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रात्री रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.रुग्णाच्या नातेवाईकांनी गडगेनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि रुग्णालयाविरोधात तक्रार केली असून पुढील कारवाई पोलीस करत आहे. सध्या मारहाण केलेल्या रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले असून जखमी रुग्णांवर उपचार सुरू आहे.




















