
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
नवरात्री उत्सवा निमित्त धुळे ते मनुदेवी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांना अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते राम भाऊ मित्र परिवारातर्फे महाप्रसाद वाटपाचे कार्यकम नुकतीच पार पडला, अमळनेरत माध्यमावर्गातील असणारे राम लखन सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. राम आणि लखन हे दोघे भाऊ सतत काही ना काही सामाजिक कार्यक्रम घडऊन आणत असतात मागे ही त्यांनी सप्तश्रुंगी गडावर जाणाऱ्या भाविकांना टी शर्ट वाटपाचा कार्यक्रम घेतला एव्हडेच नव्हे तर कार्यक्रमांचे निमित्त म्हणून आदिवासी आणि गती मंद मुला मुली च्या शाळेत खाऊ वाटपचा कार्यक्रम ही घेतला.
आता नुकतीच धुळे येथून मनुदेवी येथे जाणारे भाविकांनां त्यांनी महाप्रसाद वाटत सतत सामाजिक कार्यक्रम चालू ठेवले आहे. यावेळी अविनाश शेटे, विशाल शेटे, रफिक भाया तेली, जिगर शिंदे, जितु पाटील, गणेश सोळंकीं, सागर शेटे, अनिल बडगुजर, जॉन न्हावी, आनंद भाऊ, भूषण वाणी, इ. उपस्थित होते.