जळगाव : प्रतिनिधी
केंद्रीय विद्यालय आयोजित “स्नेहसंमेलन २०२२” दि-३०-४-२०२२ रोजी वेळ- ५.३० ते ८.०० ठिकाण- विद्यालय परिसर येथे आयोजन करण्यात आले आहे, या प्रसंगी अध्यक्षस्थान केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक मैथ्यू अब्राहम भुषवणार आहेत. व प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू प्रो.डॉ.विजय लक्ष्मी नारायण माहेश्वरी असणार आहेत.
स्नेहमंमेलना प्रसंगी केंद्रिय विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी केंद्रीय विद्यालय कटिबध्द असणार आहे, विविध गुणांचे प्रदर्शन विद्यार्थी व विद्यार्थीनी करणार आहेत.
ह्यामध्ये विद्यालय “आजादी का अमृत महोत्सव “तसेच “नवरस” ह्या विषयांवर आधारित कार्यक्रम सादर करतील.आणि विद्यालय ह्यावर्षी विद्यालयाचा “रजत जयंती समापन समारोह” साजरा करणार आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या कलागुणांचा गुणगौरव सभारंभ यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
केंद्रीय विद्यालय स्नेहसंमेलन २०२२ प्रंसगी सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी व पालकांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.




















