चाळीसगाव : कल्पेश महाले
राज्यभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत असतांना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात एका घराला भीषण आग लागल्याने एकाचा संसार उघड्यावर पडला आहे. हि आग लागताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी मदत केली असतांना देखील संसारपूर्णपणे खाक झालेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द येथील धनगर वस्ती मधील रहिवासी रविंद्र रमेश नाईक यांच्या झोपडीला दि.२४ रोजी सायंकाळी ४ वाजेनंतर अचानक लागलेल्या आगीत संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाले आहे. या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. आग एवढी ऊग्र स्वरूपाची होती की अवघ्या काही मिनिट मध्ये सर्व संसार जळुन खाक झाला. नाईक कुटुंब खुप आक्रोश करत होते.