जळगाव : प्रतिनिधी
शहरातील २२ वर्षीय तरूणीवर अल्पवयीन असतांना आठ वर्षांपासून सतत अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहत आहे. ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याची ओळख मुलीशी झाली. त्याने शाळेत होणारे विविध कार्यक्रमांचे वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल’ अशी धमकी दिली. त्यानुसार तरूणी आठ वर्षांपुर्वी अल्पवयीन असताना गाडीवर जबरदस्ती बसवून सोबत रीतेशचा मित्र बंटी आणि राहुल हे देखील होते. इंजिनघाट परिसरात घेऊन तिथे तिच्यासोबत अत्याचार केला. तर बंटी आणि राहुल यांनी अत्याचाराचे फोटो काढले तसेच तिच्या हातातील सोन्याची अंगठी काढून तिला पुन्हा शाळेजवळ सोडले. तसेच रितेश सांगितले की, ‘तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करील’ अशी धमकी दिली. त्याचप्रमाणे रितेशची आई शोभा बाविस्कर आणि बहीण यांनी मुलीला घरातून पैसे चोरून आणावे सांगितले.




















