जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२३
राज्यातील कसारा घाट अपघाताच्या मालिकेतून नेहमीच चर्चेत येत असताना आता नुकतेच मालगाडी रुळावरून घसरल्याची दुर्घटना घडली आहे. हि मालगाडी इगतपुरीच्या दिशेने जात असताना रुळावरून घसरल्याने कसारा-इगतपुरी आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात आल्या असून वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणारे प्रवाशी अडकून पडले असल्याचे देखील समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, कसाराहून इगतपुरीच्या दिशेने जाणारी मालगाडीचे डबे रुळावरून घसरले असून कसाराहून इगतपुरी व नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही मालगाडी कल्याणहून कसारामार्गे नाशिकच्या दिशेने जात होती. कसारा स्थानकातून इगतपुरी च्या दिशेने जात असताना 500 मीटर अंतरावर मालगाडी रुळावरून घसरली आहे. त्यामुळे नाशिक आणि कल्याण मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान नाशिककडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस कसारा स्थानकात थांबण्यात आली आहे.
रेल्वे मार्गावरून घसरलेले डबे हटवण्याचं काम रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. मात्र यासाठी किती वेळ लागेल हे सांगण्याची शक्यता कमी असल्यामुळे या मार्गावरील वाहतून अन्य मार्गाने वळवण्याची शक्यता आहे. दरम्यान अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती समोर आलेली नाही.