जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२३
शहरातील एका परिसरात २९ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ८० वर्षीय वृद्ध बेवारस शुद्धीत नसल्याचे जाणवले असतांना शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल मिस्त्री यांनी लागलीच घटनास्थळी पोहचत वृद्ध इसमाला उपचार करून दिल्याने वृद्ध व्यक्तीची दुपारी तब्येतीत सुधारणा झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नवीन बी.जे.मर्कट परिसरातील मुख्य रस्त्यावर सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ८० वर्षीय वृद्ध बेवारस व शुद्धीत नसल्याचे आढळून आल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते राहुल मिस्त्री यांना हि माहिती समजली असता त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेला बोलवून ८० वर्षीय वृद्ध व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करीत त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार करून ते दुपारपर्यत त्यांच्या तब्येती सुधारणा झाली होती. यावेळी राहुल मिस्त्री व अक्षय जाधव यांनी केलेल्या रुग्णसेवेचे शहरात कौतुक होत आहे.