
जामनेर : प्रतिनिधी
१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शहरातील राजमाता जिजाऊ चौक नगर परिषदे जवळ स्वच्छ भारत अभियानांतर्गत जामनेर नगरपालिकेला मिळालेल्या २.५ कोटी बक्षीसातुन तब्बल १३ घंटा गाडी तसेच एक ट्रॅक्टर खरेदी करून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा आ. गिरिश महाजन व जामनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या शुभहस्ते पार पडला.
प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील न. प. चे गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, आरोग्य सभापती मन्यार सुरैया बी. अ. मुनाफ, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, अनिस शेख, बाबुराव हिवराळे, उल्हास पाटील, आतिश झाल्टे, कैलास नरवाडे, भगवान सोनवणे, रतन गायकवाड, दत्तु सोनवणे, विजय शिरसाठ, कैलास पालवे तसेच अधिकारी व कर्मचारी वृंद नगरपरिषद जामनेर येथे उपस्थित होते.
मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी शहरातील नागरिकांना संकलित केलेला ओला व सुका कचरा घंटा गाडीत वेग वेगळा करून देण्याचे व आपल्या आजू बाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच त्या प्रसंगी सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा टोपी, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.