
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात राहणारा तरुण गोरख अशोक कोळी हा आपल्या आई आणि लहान भावासह वास्तव्यास आहे. गोरख हा सेंट्रींग काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सोमवारी घरी कोणीही नसताना गोरख ने राहत्या घरात ४ वाजेच्या सुमारास घरात कुणी नसताना ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. घराजवळ राहणाऱ्या शेजारच्यांना ही घटना समजताच त्यांनी गोरखचे मामा प्रल्हाद कोळी यांना सांगितले. याबाबत रामानंदनगर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.