
जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील विविध भागात असलेले अनधिकृत भोंगे बंद न झाल्यास उद्यापासून ‘मनसे काय काय बंद करेल हे उद्यापासून सरकारला दिसेल’ असा इशारा मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी एका फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला आहे.
सविस्त वृत्त असे की, शहरातील शनिपेठ परिसरातील शनी मंदिरात लावण्यात आलेल्या भोंग्याहुन हनुमान चालीसा लावून मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विविध ठिकाणी भोंगे लावण्यात आलेले आहे ते जर आजच्या आज बंद केले नाही तर उद्यापासून जळगाव शहरातील ज्या-ज्या भागात भोंगे सुरु असतील त्याठिकाणावरच आम्ही हनुमान चालीसा लावून आम्ही राजआदेशाचे पालन करू तसेच श्री.शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गळ्यामध्ये भगव्या शालेच्या जागेवर हिरवा साप घातल्याचेही यावेळी ते बोलले. यावेळी महानगरउपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह भाजपाचे सभापती मुकूंदा सोनवणे उपस्थित होते.