
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका कॉलनीत एक महिला स्वतःच्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळताच बुधवारी दुपारी छापा टाकुन कुंटनखाना खाना चालवणारी महिला व दलाल महिलेला अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका करण्यात यशस्वी झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका कॉलनीत एक महिला आपल्या घरामध्ये एका खोलीत कुंटणखाना चालवत होती. हि माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना गुप्त माहिती मिळाली होती. कुमार चिंथा यांच्या सूचनेनुसार बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. पथकातील एका कर्मचाऱ्याने अगोदर जाऊन घटनास्थळ कुठे आहे याची खात्री केली. त्यानंतर एक पंच बोलावून त्याला बनावट ग्राहक म्हणून दुपारी ४ वाजता त्याठिकाणी पाठविले.
सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, महिला कर्मचारी मालती वाडीले, अर्चना पाटील, राजश्री बाविस्कर, सुनील पाटील, किरण धमके, रविंद्र मोतीराया, मीनल साकळीकर, महेश महाले यांनी ४.३० च्या सुमारास छापा टाकला. घरात कुटंनखाना चालविणाऱ्या महिलेसह बनावट ग्राहक आणि आणखी २ महिला मिळून आल्या. पोलिसांनी विचारपूस केली असता एक महिला कुंटनखाना मालकीण होती तर दुसरी कमिशन घेणारी दलाल महिला होती. घरातून एका पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






















