• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

लाभार्थ्याच्या घरी जेवण, शेकोटी पेटवून ग्रामस्थांशी संवाद !

गाव चलो अभियानात आमदार मंगेश चव्हाण लोंजे गावात मुक्कामी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2024
in जळगाव, राजकीय
0
लाभार्थ्याच्या घरी जेवण, शेकोटी पेटवून ग्रामस्थांशी संवाद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४

केवळ निवडणुका आल्या किंवा लग्न समारंभ, अंत्यविधी असला तरच गावात धावती भेट ही पुढाऱ्यांची ठरलेली असते मात्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी चक्क आमदार गावाला भेट देतात व रात्रभर मुक्कामी थांबून त्यांच्याशी संवाद साधतात अस आजवर कधी घडलं नव्हतं… मात्र हो हे घडलंय भारतीय जनता पक्षाच्या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून आणि यात सहभागी होणारे आमदार आहेत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण…

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नऊ वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत मांडण्यासाठी तसेच केलेली विकास कामे यांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे “गाव चलो अभियान” राबविले जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील ग्रामविकास मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते गिरिषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुख पासून ते थेट आमदार, खासदार, मंत्री आदी लोकप्रतिनिधी यांनी देखील सहभागी होण्याचे व एक दिवस ग्रामीण भागात मुक्कामी राहण्याचे निर्देश पक्ष संघटने कडून देण्यात आले होते.

त्याअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील बुथ क्रमांक ३३८ वर स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देण्याचे निश्चित केले त्यानुसार व दि.१० फेब्रुवारी रोजी लोंजे साईनगर या गावाला त्यांनी मुक्काम केला. एवढेच नव्हे तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी असणाऱ्या कुटुंबाच्या घरी त्यांनी जेवण केले, गावात घरोघरी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे पत्रक वाटप केले. तसेच भारतीय जनता पक्षाचे चिन्ह असलेले कमळाचे व “फिर एक बार मोदी सरकार” असे भित्तिचित्रे असलेले दिवार लेखन देखील त्यांनी केले. थंडीचे दिवस असल्याने गावात बऱ्याच ठिकाणी शेकोटी देखील पेटविण्यात आली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी शेकोटीची ऊब घेत ग्रामस्थांशी संवाद साधला व आपल्या पक्षाचे बूथ प्रमुख व लोंजे साईनगर गावाचे सरपंच बळीराम चव्हाण यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला.

कोट्यवधींच्या विकासकामांचे केले भूमिपूजन व उद्घाटन, सेवालाल भवन देखील उभारण्याचे दिले आश्वासन

चाळीसगाव तालुक्यातील लोंजे गावातून आंबेहोळ व साईनगर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विभक्त करण्यात आल्या होत्या. नवीन ग्रामपंचायतींचे हे पहिलेच वर्ष असल्याने त्यांना विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले होते. गेल्या ४ वर्षात आपल्या आमदारकीच्या माध्यमातून लोंजे आंबेहोळ व लोंजे साईनगर या दोन्ही गावात मंजूर असलेल्या कोट्यवधींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण देखील त्यांनी केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, माजी जि. प.सभापती राजुभाऊ राठोड, कृउबा सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, माजी पं. स.उपसभापती सतिश पाटे, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, अमोल नानकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, नमोताई राठोड, सुनील पवार, धनराज तात्या पाटील, विवेक चौधरी, कैलास पाटील, राम पाटील, राजू पगार, संजय कुमावत, लोंजे सरपंच बळीराम चव्हाण, आंबेहोळ सरपंच भरत शेट चव्हाण, जुनोने सरपंच गोरख राठोड, वागले सरपंच रामदास पवार, वलठाण सरपंच सीताराम राठोड, गोरखपुर् उपसरपंच योगेश जाधव, चैतन्य तांडा सरपंच व चेअरमन दिनकर राठोड, शिंदी उपसरपंच व युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, बोढरे सरपंच गुलाब राठोड, खेर्डे उपसरपंच ममराज जाधव, सायगव्हाण माजी सरपंच बाबू राठोड, कृष्णनगर उपसरपंच मनोज चव्हाण, वाकडी सरपंच. प्रकाश पाटील, राजणगाव सरपंच प्रमोद चव्हाण सर, विनीत राठोड, बबलू चव्हाण, अविनाश राठोड, वाडिलाल राठोड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार आपल्या गावात मुक्कामी असल्याने म्हणजे गावात देखील एक उत्साहाचे वातावरण होते. अबाल वृद्ध महिला माता भगिनी यांच्याशी त्यांनी संवाद साधत मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली. रात्री १० वाजता उशिरा झालेल्या संवाद सभेला शेकडो ग्रामस्थ विशेषतः माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही गावांना संत सेवालाल भवन उभारण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले.

मंजूर असलेली विकासकामे खालीलप्रमाणे

१) लोन्जे आंबेहोळ येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे – 20 लक्ष
२) लोन्जे आंबेहोळ येथे सिमेंट रस्ता किंवा पेव्हर ब्लॉक बसविणे. – 15 लक्ष
३) लोन्जे आंबेहोळ येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे करणे ता.चाळीसगाव – 10 लक्ष
३) आंबेहोळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना -155 लक्ष
४) लोंजे आंबेहोळ येथे रस्ता सुधारणा करणे -10 लक्ष
५) लोंजे साईनगर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना -105 लक्ष
६) लोंजे साईनगर येथे स्मशानभूमी व अनुषंगिक कामे करणे -15 लक्ष
७) लोंजे साईनगर येथे सिमेंट रस्ता -15 लक्ष
८) लोंजे साईनगर येथे चौक सुशोभीकरण करणे -13 लक्ष
लोंजे साईनगर येथे रस्ता सुधारणा करणे -10 लक्ष
९) लोंजे साईनगर येथे चौक सुधारणा करणे – 10 लक्ष
१०) लोन्जे ते सांगवी रोड VR-153 – 1 कोटी 20 लक्ष
११) लोन्जे ते जिल्हा बॉर्डर शिव तांडा रस्ता VR–198 – कोटी

राष्ट्रीय महामार्ग 211 ते रांजणगाव लोंजे हा रस्ता ग्रामीण मार्ग असल्याने त्याला निधी आणता येत नाही, त्यामुळे त्याची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती प्रस्तावित केली आहे. त्यामुळे ५ मीटर रुंद रस्ता करता येईल अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Tags: #chalisgaonaamdar mangesh chavhan

Related Posts

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026
मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!
क्राईम

मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group