जळगाव मिरर | १६ मार्च २०२४
तालुक्यातील कुसुंबा येथे राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवार १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपासून मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा घेत गावात राहणारा निखील नवनीत पारधी याने तिला काहीतरी अमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून निखील पारधी याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरूवार १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निखील पारधी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















