जळगाव मिरर | २८ मार्च २०२४
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने काही विशेष गाड्यांचा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. क्र. ०१०२५ दादर-बलिया त्रि- साप्ताहिक विशेष गाडी आता १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत तसेच क्र. ०१०२६ बलिया-दादर त्रि-साप्ताहिक विशेष गाडी आता ३ एप्रिल ते ३ जूनपर्यंत वाढविण्यात येत आहे.
क्र. ०१०२७ दादर-गोरखपूर ही आठवड्यातून ४ दिवस असलेल्या गाडीची मुदत आता २ एप्रिल ते ३० जूनपर्यंत तर क्र. ०१०२८ गोरखपूर- दादर ही विशेष गाडीची मुदत ४ एप्रिल ते २ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. क्र. ०११३९ नागपूर-मडगांव ही विशेष गाडी आता ३ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावणार आहे. बडनेरा- नाशिक नियमित अनारक्षित विशेष क्र. ०१२११ बडनेरा-नाशिक विशेष गाडीची मुदत १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत तर क्र. ०१२१२ नाशिक-बडनेरा या गाडीची मुदत १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे