• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर : जळगावात पवारांना संधी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 3, 2024
in जळगाव, राजकीय
0
ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर : जळगावात पवारांना संधी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना व जळगाव जिल्ह्यातील खा.उन्मेष पाटील यांनी भाजपला धक्का देत ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या आणखी 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर यांना संधी देण्यात आली आहे. तर जळगावमधून करण पवार, हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील व पालघर लोकसभा मतदार संघातून भारती कामडी या सर्वसामान्य शिवसैनिक कार्यकर्तीला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

जळगावचे भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी बुधवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना उद्धव ठाकरे यांनी कल्याण, जळगाव, हातकणंगले व पालघर या 4 लोकसभा मतदार संघांतील आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर या कार्यकर्तीला संधी दिली आहे. कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे आता शिंदे यांना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा सामना करावा लागेल.

याशिवाय जळगाव लोकसभा मतदार संघात करण पवार यांना संधी देण्यात आली आहे. करण पवार हे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे समर्थक आहेत. त्यांचा स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव आहे. विशेषतः करण पवार यांनी बुधवारीच उन्मेश पाटील यांच्यासोबत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उन्मेश पाटील यांचीही मोठी ताकद मिळणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात करण पवार यांचा सामना भाजपच्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्मिता वाघ यांच्याशी होईल.

ठाकरे गटाने पालघर लोकसभा मतदार संघातून भारती कामडी तर हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भारती कांबळी या आदिवासी समुदायाच्या शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघ आपल्या मित्र पक्षाला सोडण्याची तयारी दर्शवली. मुंबई उत्तर लोकसभा आमचा मित्रपक्ष लढणार असेल तर ती त्यांना दिली जाईल. अन्यथा आम्ही आमचा उमेदवार तिथे देऊ, असे ते म्हणाले. मुंबईतील 6 पैकी 4 जागांवर आम्ही उमेदवार दिलेत. उर्वरित 2 जागा मित्र पक्षांनी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. शिवसेना या दोन्ही ठिकाणी त्यांना मदत करेल. सद्यस्थितीत देशाती हुकूमशाही सरकारविरोधात लाट असून, ही लाटच कोणत्याही जागा जिंकून देण्याएवढी सक्षम आहे, असेही ते यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले.

Tags: #jalgaonLoksabha electionsThakare gat

Related Posts

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026
मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!
क्राईम

मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group