• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

‘बा, तथागता: मानवतावादी सौंदर्यशास्त्र ‘ या ग्रंथावरील चर्चाचिंतन व प्रकाशन सोहळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2024
in जळगाव ग्रामीण
0
‘बा, तथागता: मानवतावादी सौंदर्यशास्त्र ‘ या ग्रंथावरील चर्चाचिंतन व प्रकाशन सोहळा
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

म. क्रांतिबा फुले जयंती विशेषाच्या निमित्ताने दिनांक ११ एप्रिल रोजी ‘बा’ तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पूज्य साने गुरुजी सभागृह प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. मानवतावादी विचारवंत तथा सुप्रसिद्ध साहित्यिक म. सु. पगारे लिखित ‘बा, तथागता’ या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या विशाल काव्यावर आधारित चर्चाचिंतन तसेच ‘ बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या डॉ. रमेश माने संपादित समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा जिज्ञासू अभ्यासक आणि श्रोत्यांसाठी एक वैचारिक मेजवाणी ठरणार आहे. या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा कवी लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. एन. के. ठाकरे हे अध्यक्ष म्हणून राहाणार आहेत. तसेच या ग्रंथाच्या निमित्ताने विविध अंगाने चर्चा, टिप्पणी, समीक्षा आणि संशोधन अशा चौफेर पद्धतीने वैचारिक मतांचा ऊहापोह या कार्यक्रमात होणार आहे.

या कार्यक्रमात चर्चाचिंतनासाठी प्राचार्य तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ व अभ्यासक डॉ. धनराज धनगर यांची चर्चक म्हणून मार्मिक मल्लिनाथी होणार आहे.

तथागत भगवान बुद्ध यांच्या विशुद्ध कृतिशील संशोधनातील विचार तत्त्वज्ञानाचा माणसाच्या सर्वंकष कल्याणासाठी होणारा उपयोग ही संपूर्ण मानवी कल्याणाची जमेची बाजू आहे. त्या संदर्भातील सूक्ष्म अभ्यास, चिंतन, निरीक्षण व संशोधन करून डॉ. म. सु. पगारे यांनी तीन आविष्करणातून सामान्य माणसातल्या सामान्य वाचकाला कळावे आणि त्यातून शुद्ध आचरणाची प्रेरणा मिळावी, अशा पद्धतीचा विशाल काव्याचा प्रयोग या ग्रंथातून केला आहे. साहित्य, तत्वज्ञान, इतिहास अशा विविध अनुषंगाने हा पूर्णतः वेगळा आणि नाविन्यपूर्ण प्रयोग असल्यामुळे या ग्रंथाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. बा, तथागता या ग्रंथाच्या दोन आवृत्या प्रकाशित होऊन संपण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे या ग्रंथाची हिंदी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होणार असून इंग्रजी आवृत्तीचे देखील नियोजन सुरू आहे. शिवाय अहिराणीमध्ये देखील नव्याने आवृत्ती प्रकाशित होण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे या ग्रंथातील मांडणी मोठ्या जनसमूहाला विवेकी पध्दतीने विचार करायला लावणारी आहे तसेच मानवतावादाच्या केंद्राला स्पर्श करून माणुसकीचे मूल्य जोपासायला लावणारी आहे.

‘बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या डॉ. रमेश माने यांनी संपादित केलेल्या ग्रंथामध्ये एकूण एकवीस विचारवंतांच्या संशोधन व समीक्षणात्मक लेखांचा वैविध्यपूर्ण धांडोळा आढळतो. त्यामुळे अशा महत्त्वाच्या असणाऱ्या प्रकाशन सोहळ्यासाठी मान्यवर म्हणून प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन तसेच प्रशांत पब्लिकेशनचे प्रकाशक रंगराव पाटील हे उपस्थित राहाणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे दिमाखदार सूत्रसंचालन एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे हे करणार आहेत. या चर्चाचिंतनाचा आणि प्रकाशन सोहळ्याचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आयोजक मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश माने व मराठी विभागातील प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावीत, प्रा. प्रतिभा पाटील यांनी आवाहन केले आहे.

Tags: #amalnerKrantiba fule

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group