जळगाव मिरर | १ मे २०२४
राज्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी व खुनाच्या घटना घडत असतांना माणुसकीला काळिमा फासणारी घटना कोल्हापूर शहरातून समोर आली आहे. बायकोसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने त्याच्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी बरोबर मोबाईलवर बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने केली आईची हत्या केली आहे. कोल्हापूरच्या साळोखे पार्क येथे कौटुंबीक वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वत:च्या आईची हत्या करणाऱ्या सादिक मुजावरला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. शहनाज मुजावर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. मुलाने आईच्या छाती, पोट आणि पाठीवर धारदार वार करून हत्या केली.
कोल्हापूरच्या साळोखे पार्क येथे हे कुटुंब राहत होते. या कुटुंबात वाद व्हायचे. याचदरम्यान, कोल्हापूरमधील सादिक मुजावर हा बायकोसोबत बोलत होता. त्यावेळी त्याची आई शहनाज मुजावर यांनी मध्येच बोलल्या. यामुळे मुलगा सादिकला राग आला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. सादिकने आईच्या छाती, पोट आणि पाठीवर धारदार श्त्राने वार केले. या मारहाणीत त्याची आई शहनाज मुजावरचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.