जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मासूमवाडी चौकात एका तरूणाला पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, कासमवाडी परिसरातील अफसर खान जाकीर खान (वय-२१) हा तरुण रिक्षा चालवून आपला उदनिर्वाह करतो. तरुण गुरुवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मासुमवाडी चौकातील महाराष्ट्र बर्फ गोलावाला रामदेव यांच्याकडे गोळा खाण्यासाठी गेला होता. याठिकाणी जाकीर शिकलीकर, जावेद शिकलीकर, आवेश शिकलीकर, गुड्डू उर्फ तंबाखू, अण्णा गुड्डूचा भाऊ, सिद्धीक शिकलीकर, जाकीर शिकलीकर सर्व रा. मासुमवाडी यांच्यासह इतर व्यक्ती हे त्याठिकाणी आले. त्यांनी गोळा विक्रेत्याला गाडी काढण्यास सांगितले. यावेळी अफसर खान जाकीर खान यांनी त्या तरुणांना रामदेव याला त्याचा धंदा करु द्या असे बोलला. त्याचा राग आल्याने त्या तरुणांनी अफसर खान यांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. यात एकाने अफसरच्या डोक्यात दगड मारला तर इतरांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून जखमी केले. याबाबत अफसर खान याने एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रदीप पाटील हे करीत आहे.





















