• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

येत्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांच्या पाठीशी ताकदीने उभे रहा – प्रदेशाध्यक्ष

मुक्ताईनगर विधानसभे साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी रोहिणी खडसे यांनां जाहिर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 5, 2024
in राजकीय, जळगाव
0
मतदान जनजागृती व स्काऊट शिक्षण एक संस्कार विषयावर व्याख्यान उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ मे २०२४

येत्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा असे आवाहन करत विधानसभा निवडणुकीसाठी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची उमेदवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी जाहिर केली.

तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांना विधानपरिषद मध्ये संधी देण्यात येईल असे सांगितले रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटिल यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रचारसभा मुक्ताईनगर येथे पार पडली.

या सभेत मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी येत्या सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या उमेदवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे असतील अशी घोषणा केली.

यावेळी जयंत पाटिल म्हणाले मला आठवतं नाथाभाऊ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पवार साहेबांच्या समोर रोहिणी खडसे यांनी सांगितलं की, नाथाभाऊंना कुठे जायचं तिकडे जाऊ दे, पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. काही झालं तरी मी तुमच्यासाठी काम करणार आहे. वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीने वेगळा निर्णय घेणे हे सोप्पं काम नाही. पण रोहिणीताईंनी तो निर्धार केला. पवार साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत. या विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेला आपल्या उमेदवाराला तुम्ही लीड द्याल यात शंका नाही. पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथे उभ्या राहणार आहेत. त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीन उभे राहावे लागेल, असे जयंत पाटील म्हणाले यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना 12 फेब्रुवारी 2022 मध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथे जयंत पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेत देखिल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रोहिणी खडसे या उमेदवार असतील अशी घोषणा केली होती.

त्यावेळी ते म्हणाले होते रोहिणी खडसे यांचा पराभव करून त्यांचे जे नुकसान मागच्या (2019च्या विधानसभा) निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल असे म्हणत विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना जाहीर केली होती.

रोहिणी खडसे यांनी 2019 मध्ये मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपा च्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला होता पराभव झाल्यानंतर पराभवाने खचून न जाता रोहिणी खडसे यांनी दुसऱ्या दिवसांपासून मतदार संघात राजकीय सामाजिक कार्य सुरू केले होते.

त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आपल्या मतदारसंघात शेवटच्या घटकापर्यंत जनसंपर्क करण्याचा त्यांच्या प्रयत्न असतो त्यासाठी मतदारसंघात सतत दौरे करून सर्वांच्या सुख दुःखात अडीअडचणीत त्या सहभागी होत असल्याचे दिसून येते. मतदारसंघातील विद्यार्थी, तरुण, वृद्ध,अपंग निराधार, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शेतमजूर,नोकरवर्ग आदिवासी असो प्रत्येकाच्या समस्यांना, सार्वजनिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील या असल्याचे दिसते त्यासाठी पाठपुरावा, आंदोलन, मोर्चे काढण्याची त्यांची सदैव तयारी असते मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील 182 गाव खेडे वस्त्यांवर काढलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा राज्यभरात लक्षवेधी ठरली या यात्रेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या सार्वजनिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा केला तसेच पक्षाची संघटन बांधणी करून पक्षाच्या अठरा हजार सभासदांची नोंदणी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद दिले या पदाला न्याय देऊन पक्ष संघटन वाढविण्यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे दिसते त्यासाठी त्यांनी विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागाचे दौरे करून पक्ष संघटनेचे मेळावे नियुक्त्या करून पक्ष संघटन वाढीस चालना दिली.

एकनाथराव खडसे यांनी भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वर्धा, नागपूर, रामटेक, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून उमेदवारांचा प्रचार केला.

बारामती लोकसभा मतदारसंघात
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात असलेल्या हाय व्होल्टेज मुकाबल्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ खडकवासला विधानसभा क्षेत्रात कॉर्नर सभा प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधत सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला. रावेर लोकसभा मतदारसंघात आपल्या वहिनी रक्षा खडसे यांच्या विरोधात पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारात आणि रणनीती आखण्यात रोहिणी खडसे आघाडीवर आहेत. जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी खडसे यांच्या नियोजनातच मुक्ताईनगर येथे शरद पवार यांची भव्य सभा पार पडली या सभेतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोहिणी खडसे यांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे परत एकदा उमेदवारी जाहीर केली. रोहिणी खडसे या घेत असलेली मेहनत त्यांचा जनसंपर्क व पक्षाच्या पाठबळाच्या जोरावर त्या मुक्ताईनगर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवतील अशी मुक्ताईनगर मतदारसंघात जनमानसात चर्चा सुरू झाली आहे

Tags: jayant patilrohini khadse

Related Posts

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !
क्राईम

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

बचत गटाच्या पैशांचा वाद : चौघांनी केली परिवारातील सदस्यांना मारहाण !

July 3, 2025
मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !
क्राईम

मद्य वितरक परवाण्याचे आमिष : जळगावातील दोघांनी केली लाखात फसवणूक !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

Recent News

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025
भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

भरदुपारी भरधाव चारचाकीच्या धडकेत तरुण जागीच ठार !

July 3, 2025

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group