• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले 

राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. विविध ठिकाणी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून कारवाया होत असताना जळगाव जिल्ह्यात मात्र दिवाळीसारखा मोठा सण जवळ आला असतानाही अशा प्रकारची ठोस कारवाई सार्वजनिकरीत्या दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दिवाळीचा सण म्हटला की मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. जळगाव शहरातही सध्या मिठाई आणि फराळ तयार करण्याची लगबग सुरू आहे. अनेक मिठाईची दुकाने, रेस्टॉरंट्स तसेच विविध ठिकाणी खाद्यपदार्थांची निर्मिती आणि विक्री केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, खाद्यपदार्थ तयार करताना आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे की नाही, याबाबत तपासणी होणे गरजेचे आहे.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त किंवा अस्वच्छ वातावरणात तयार केलेले खाद्यपदार्थ नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मिठाईची दुकाने, फराळ उत्पादक आणि रेस्टॉरंट्सची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात प्रशासनाची सक्रियता नेमकी कुठे दिसतेय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत जळगाव शहरातील सहा आयुक्त यांना संपर्क केला असता त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेल्या नाही.

जळगाव शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे यापूर्वी तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याने आता त्यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे धाव घेतली आहे. शहरातील मिठाईची दुकाने, फराळ तयार करणारी ठिकाणे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांबाबत तक्रारी करण्यात आल्याची चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे.  राज्याच्या इतर भागांत प्रशासनाकडून कारवाई होत असताना जळगावमध्येही तशाच प्रकारची तपासणी आणि कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. आयुक्तांच्या थेट हस्तक्षेपानंतर जळगावमधील मिठाई दुकाने, रेस्टॉरंट्स आणि फराळ उत्पादकांच्या तपासणीला वेग येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिवाळीच्या गोडव्यात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये, यासाठी जळगावच्या अन्न व औषध प्रशासनाने आता तरी जागे होण्याची गरज आहे!

Related Posts

जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!
क्राईम

जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

November 9, 2026
जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!
क्राईम

जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

November 9, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल
क्राईम

सिंधी कॉलनीत आगीचे तांडव : टीव्ही, फ्रीज, एसीसह घरातील सर्व साहित्य जळून खाक!

November 9, 2026
जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !
जळगाव

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

November 8, 2026
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!
जळगाव

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव ग्रामीण

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

जळगावच्या तेल कंपन्यांवर एफडीएची धडक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीचा तेलसाठा सील!

November 9, 2026
जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

जळगावातील टेकडीवर आगीचा भडका : अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी!

November 9, 2026
जळगावात बाप्पाच्या मिरवणुकीत ‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; गुन्हा दाखल

सिंधी कॉलनीत आगीचे तांडव : टीव्ही, फ्रीज, एसीसह घरातील सर्व साहित्य जळून खाक!

November 9, 2026
जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

November 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group