
शेंदुर्णी ता. जामनेर :प्रतिनिधी
येथील पीक संरक्षण सोसायटीमध्ये निवडणूक संस्था स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच झाली. यात १३ च्या १३ जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले. पीक संरक्षण सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी अधिकारी एस एस पवार उपस्थित होते.
चेअरमन पदी विद्यमान चेअरमन संजय ओंकार गोतमारे यांचा एकमेव अर्ज आला. त्यांच्या अर्जाला अतुल जहागीरदार सूचक व अनुमोदक भगवान बारी होते. त्यामुळे संजय ओंकार गोतमारे यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली. व्हाईस चेअरमन पदी प्रवीण कडोबा सूर्यवंशी यांना मोतीलाल माळी सूचक, बापू चौधरी अनुमोदक होते. प्रवीण सूर्यवंशी यांचीही बिनविरोध निवड झाली.
यावेळी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते उत्तमराव थोरात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल ,प्रकाश झंवर,अमृत खलसे उपनगराध्यक्ष निलेश थोरात, पंडितराव जोहरे, कडोबा माळी, कडोबा सुर्यवंशी, इमाम शेख, नगरसेवक श्याम गुजर, सतीश बारी, अँड. धर्मराज सूर्यवंशी, पिंटू काझी, प्रदीप गुजर, डॉ पंकज सूर्यवंशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संचालक अतुल जहागीरदार यांनी केले. यावेळी गोविंद अग्रवाल ,अमृत खलसे व उत्तमराव थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. आभार चेअरमन संजय गोतमारे यांनी मानले.




















