जळगाव मिरर | २१ जून २०२४
जिल्ह्यासह राज्यभर व विशेषतः पुण्यात विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ग्रामगौरव फौंडेशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक चळवळीत सतत सक्रिय असलेले विवेक देविदास ठाकरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.संस्थेस धर्मदाय आयुक्त विभागाचे सहाय्यक संस्था निबंधक यांच्याकडून परवानगी मिळून तसे नोंदणी प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
ग्रामगौरव फौंडेशनचे कार्यकारी पदाधिकारी असे : विवेक ठाकरे (अध्यक्ष), वासुदेव नरवाडे (उपाध्यक्ष), सुभाष मराठे (सचिव), भाग्यश्री ठाकरे (कोषाध्यक्ष), दस्तगीर खाटीक, धनश्री ठाकरे व गौरव रणदिवे हे सदस्य आहेत.संस्थेच्या वतीने लवकरच शैक्षणिक,पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्य, क्रीडा,कृषि, ग्रामीणविकास असे लोकहिताचे विविध उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत.