जळगाव ः प्रतिनिधी
देशात सुरु असलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जळगाव शहराच्यावतीने गॅस व डिझेल दरवाढी विरोधात गॅस हंडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून तीव निषेध यावेळी व्यक्त केला.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या कित्येक दिवसापासून दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व ग ॅस दरवाढ झपाट्याने वाढ सुरुच आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आकाशवाणी कार्यालयातून गॅस हंडीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या अंत्ययात्रेत महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा आकाशवाणी कार्यालयातून सकाळी 10.30 वा.निघून जिल्हाधिकारी कार्यालयाला जावून धडकला.
या हल्लाबोल आंदोलनात जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील, जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन ॲड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, माजी पालकमंत्री डॉ.सतिष पाटील, मनिष जैन, माजी आ. कैलास पाटील, नामदेवराव चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मंगला पाटील, अशोक लाडवंजारी, योगेश देसले, रिंकू चौधरी, उमेश नेमाडे, किरण राजपूत, एजाज मलिक, सुनिल माळी, अरविंद मानकरी आदी उपस्थित होते.