जळगाव मिरर | २० जुलै २०२४
भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारात एका २२ वर्षीय तरुणांचा मृतदेह शेतात फुगलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतनेमकी हत्या की घातपात, या दिशेने तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव शिवारातील शेतात एका २२ वर्षीय तरुणाचा मूत्तदेह गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पडलेला असल्याने तो फुगलेला होता. सायंकाळी तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फुगलेल्या अवस्थेत हा मृतदेह मिळून आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश गायकवाड, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ तसेच पोलीस कर्मचारी संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, रशीद तडवी, संजय भोई यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, ही हत्या आहे की घातपात ? हे स्पस्ट झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस अधिकारी त्या दिशेने तपास करत आहेत.