जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२४
शहरातील एका परिसरात राहणाऱ्या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना दि. १ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंधरा वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबियांच्या खरवालीतून फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध रामानंद पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर हे करीत आहे.