• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

तर लाडकी बहीण योजना पंचवार्षिक करु ; दादांनी केला जनतेला वादा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
तर लाडकी बहीण योजना पंचवार्षिक करु ; दादांनी केला जनतेला वादा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२४

आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी सर्वच पक्षांचे नेते आता राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना राष्ट्रवादीचे अजित पवार देखील आता दौऱ्यावर असून नाशिक येथे अजितदादांनी मोठा वादा केला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात १७ तारखेला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे अनुदान जमा करण्याचा प्रयत्न आहे. विरोधक यावर निवडणूक जुमला असल्याची टीका करत असले तरी कालच सहा काेटीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आम्हाला जनतेने पुन्हा संधी दिल्यास ही योजना पुढील पाच वर्षदेखील चालूच राहिल, हा अजितदादाचा वादा असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रेचा दिंडोरीतून शुभारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, अर्थसंकल्पात प्रत्येक घटकाचा विचार केला. शेतकर्‍यांसाठी नवसंजीवनीसारख्या योजना आणल्या. वर्षांला ५२ लाख कुटूंबांना तीन सिलिंडर मोफत देणार. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण, सर्व जाती धर्माच्या मुलींना उच्चशिक्षण मोफत, ४४ लाख शेतकर्‍यांना वीजबिल माफीचा फायदा, कांदानिर्यात सुरुच ठेवणार, दुधाला पाच रुपये अनुदान, सोयाबीन, कापूस या पिकाला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान, शेतकर्‍यांना सोलरपंप देणार, ग्रामीण रस्ते विकास अशा विविध योजनांची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर पश्‍चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वकडे वळवून मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नार-पार योजनेला आंचारसंहितेपूर्वीच निधी देणार, त्याचबरोबर फक्त पिण्याच्या पाण्यासाठी टिटवी हे नवीन धरण बांधणार असून त्यासाठी केंद्राकडून अतिरीक्त निधी मिळवत प्रत्यक्षात प्रकल्प साकारणारच असा विश्‍वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी प्रास्ताविकात, दिंडोरी उपजिल्हा रुग्णालयासाठी निधी आणला, परंतू जागेचा प्रश्न आहे. कृषी विभागाकडे असलेल्या जागेपैकी आवश्यक जागा उपजिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी कृषीमंत्र्यांकडे केली. मुंडे यांनी देखील तत्काळ संमती देत प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

जनसन्मान यात्रेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. जनसन्मान यात्रेसाठी गुलाबी बस होती. उपमुख्यमंत्र्यांनी याच बसमधून प्रवास केला. कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संगिता राऊत, प्रकाश वडजे आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !
जळगाव

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !
जळगाव

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

June 22, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’
जळगाव ग्रामीण

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group