जळगाव मिरर | ५ सप्टेबर २०२४
तुम्हारी बेटी का व्हिडीओ मेरे मोबाईल पे आया है, मै वो आपको दिखावू क्या? मेरी आपकी बेटी से फ्रेंडशिप करवाओ असे म्हणत विवाहितेसोबत अश्लिल भाषेत बोलून विनयभंग केला. ही घटना दि. ६ ऑगस्ट रोजी सिंधी कॉलनी परिसरात घडली. दरम्यान, महिलेने याबाबत तक्रार न देण्याच्या मोबदल्यात पैसे घेतले असल्याची बदनामी केल्याप्रकरणी संशयित बबला तलरेजा याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात विवाहिता वास्तव्यास असून तिच्या सोळा वर्षीय मुलीला अश्लिल व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. दि. ६ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील बबला नारायणदास तलरेजा यांच्या एस. एस.जी कॅटरिंग येथे नाश्ता घेण्यासाठी गेली होती. याठिकाणी बबला तलरेजा हा विवाहितेला तुम्हारी बेटी का व्हिडीओ मेरे मोबाईल पे आया है, मै वो आपको दिखावू क्या? मेरी आपकी बेटी से फ्रेंडशिप करवाओ असे म्हणत विवाहितेसोबत अश्लिल वर्तन केले. यावेळी विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली.