पाचोरा : प्रतिनिधी
गेल्या २५ ते ३० वर्षापासून पाचोरा नगरपालिकेमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय झालेला असून हा ठराव मंजूर आहे. परंतु प्रत्यक्षात नियोजित जागेवर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा अजून पर्यंत बसविण्यात आला नाही. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सुनील आनंदराव शिंदे, माजी नगरसेवक अशोक शंकर मोरे, वासुदेव भिवसन माळी, समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे यांचे दि. २० जून रोजी सकाळी १० वाजेपासून नगरपालिके समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणास समता सैनिक दल, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखा, पाचोरा, मराठा सेवा संघ (पाचोरा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पाचोरा), संभाजी ब्रिगेड (पाचोरा), युवक काँग्रेस (पाचोरा), शिवस्वराज्य युवा फाउंडेशन (पाचोरा) सह पाचोरा शहरातील पुरोगामी संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला आहे.
उपोषणास अॅड. अविनाश भालेराव, अॅड. अण्णासाहेब भोईटे, अॅड. अनिल पाटील, अॅड. रणजीत तडवी, मा. नगरसेवक बशीर बागवान, विलास पाटील, खलील देशमुख, भरत खंडेलवाल, नंदकुमार सोनार, मच्छिंद्र जाधव, धनराज मेघराज पाटील, मतीन बागवान यांनी समर्थन दिले.