शेंदुर्णी ता.जामनेर :प्रतिनिधी
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयामध्ये शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांवरील इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची शोभा यात्रा शेंदुर्णी शहरातून काढण्यात आली.
यावेळी सर्व शाखा वरील गुणवंत विद्यार्थी या मध्ये शेंदुर्णी, पाळधी, वाकोद, विटनेर, पळसखेडा ,बेटावद, वाकडी, लोहारा, तोंडापूर, वरखेडी ,नांद्रा ,तारखेडा, वडगाव ,गणपुर, मंगरूळ येथील विद्यार्थी हे शेंदुर्णी नगरपंचायत च्या प्रांगणात एकत्र जमून या ठिकाणाहून गरुड विद्यालयातून तालुक्यातून प्रथम आलेली पूर्वा श्रीकांत काबरा व तालुक्यातून द्वितीय आलेली ऐश्वर्या हितेंद्र गरुड या विद्यार्थिनींची घोड्यावर बसून व शेंदुर्णी संस्थेच्या सर्व शाखा वरील गुणवंत विद्यार्थिनी विद्यार्थी यांची गावातून शोभायात्रा काढण्यात आली.
यावेळी या शोभायात्रेची सुरुवात संस्थेचे सचिव सतीश काशीद संस्थेच्या महिला संचालिका उज्वला काशीद संस्थेचे वस्तीग्रह सचिव कैलास देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही आर पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार उपमुख्याध्यापक ए बी ठोके सर्व शाखांवरील विद्यालयाचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक ,विद्यार्थी या शोभायात्रेत सामील झाले होते.या शोभायात्रेला हिरवा ध्वज हा संस्थेचे सचिव सतिश काशीद यांनी दाखवला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार यांनी केले. विद्यालयाच्या व संस्थेच्या सर्व शाखां वरील गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन त्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये संस्थेचे सचिव सतीश जी काशीद, संस्थेचे संचालक यू.यू पाटील, संस्थेच्या महिला संचालिका उज्वलाताई काशीद विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार, उपमुख्याध्यापक ए बी ठोके, संस्थेच्या तसेच सर्व शाखांवरील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, पालक या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन संजय रावजी गरुड संस्थेचे सहसचिव दीपक गरुड यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी जी पाटील यांनी केले तर आभार डी बी पाटील यांनी मानले.