जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४
आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक तरुण आपल्या करिअरमध्ये व अस्थिर असलेले दिसून येतात. यातच घेतलेले निर्णय चुकीचे निघाल्यावर निवडलेल्या वाटेवर अपयश मिळत असताना वेळेत सावरत त्यातून शिकत जाऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर एक नवीन संकल्पना व कौशल्य राबवित एक नव्या स्टार्टअप चे सुरुवात करून त्यात यश मिळावता येते असा तरुणाईला नवा संदेश देणारा तरुण म्हणजे वैभव युवराज पाटील.
गाव नगांव ता. जि. नंदुरबार आजोबा सरपंच नंतर वडील सरपंच अशा राजकीय वातावरणात वाढत असताना वैभव पाटील या तरुणाला वाचनाची आवड घरातूनच मिळाले. करीयर आणि वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर येत असताना स्वतःच्या मर्जीने घेतलेले अनेक निर्णय चुकले आणि अपयशाचा फेरा सुरू झाला. हा मुलगा वाया जाईल का काय असे वाटत होते. याही परिस्थितीत योग्य वयात, योग्य गोष्टी हे सूत्र घेऊन त्याची वाटचाल सुरू होती. वैभव सांगतो, सुरुवातील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना या क्षेत्रासाठी उमेदीची काही वर्ष त्यागण्याची आपली मनाची तयारी नाही आणि जे करायचे ते याच वयात हा संकल्प घेऊन त्याने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला निरोप दिला आणि नव्या करीयरच्या संधी शोधण्याचा प्रवास सुरू झाला. आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर वाचन थांबले नाही आणि म्हणून वेळोवेळी मार्ग सापडत गेले. बदलत्या जगाबद्दल असणारे कुतूहल आणि घरातून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य यातून त्याला डिजिटल मार्केटिंग आणि पब्लिक रिलेशन या क्षेत्राची ओळख झाली आणि याच क्षेत्रात दीड वर्ष नोकरी करून त्याने स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ‘पी मीडियावर्क्स’ (Pi mediawork’s) या नावाने पुणे येथे सुरू झालेली कंपनी ही राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया इमेज बिल्डिंग, कॉर्पोरेट ब्रँड कन्सलटंसी, डिजिटल मार्केटिंग अशा विविध माध्यमातून सेवा देण्याचे काम करत आहे.
विधानसभा निवडणुकीत दाखविली कौशल्यता
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील ४ जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात २६ तरूणांच्या टीमला सोबत घेऊन ‘पी मीडियावर्क्स’ कंपनीने काम केले आहे. तसेच सातत्याने अनेक कमर्शियल ब्रँडसोबत काम करत असते.
कंपनीच्या नावाची अशी संकल्पना
गणितातील Pi ही संकल्पनेची व्याख्या म्हणजे Pi is the only constant असे म्हटले जाते. त्यावरून आमची सेवा घेतली तर तुमचा व्यवसाय, तुमचे राजकारण शाश्वत होईल असा साधा सरळ अर्थ या कंपनीच्या नावात दडलेला आहे. Pi mediawork’s चे पुण्यातील वाकड सारख्या आयटी कंपन्यांच्या परिसरात ऑफिस असून राज्यातील सर्वसामान्य घरातील तरुणांना या माध्यमातुन रोजगार प्राप्त होत आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने दर्जेदार सेवा देणार-वैभव पाटील
येणाऱ्या काळात आर्टीफिशियल इंटलिजन्सचा वापर करून अधिक वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने Pi Mediaworks या स्टार्टअपला महाराष्ट्रातील डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील प्रमुख नाव म्हणून प्रस्थापित करण्याचा मानस असल्याचा वैभव पाटील यांचा आहे.