
जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील महाविद्यलयीन तरुणाचा दि २२ रोजी सकाळी पहूर येथील खर्चाने फाट्याजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की पहुर पाळधी येथील रहिवाशी समाधान देवसिंग परदेशी (वय २२) हा तरुण सकाळी सोयगाव येथे परीक्षा असल्यामुळे तो पेपर देण्यासाठी मोटरसायकल क्रमांक MH 19 BS 0235 या मोटरसायकली ने जात असताना जळगाव – औरगाबाद महामार्गावर पहूर जवळ खर्चाने फाटा दरम्यान पंचर झालेल्या उभी असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्याच्या हातापायाला डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे समाधान परदेशी याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली आहे.
येथील काही नागरिकांनी घटनास्थळी दाखल होऊन मयत समाधान परदेशी याला ताबडतोब पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता या डॉक्टर अजय राठोड यांनी मृत्यू झाल्याची सांगितले.




















